Monday, 22 June 2026

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा केवळ 24 टक्के असून मागील वर्षी याच काळात तो 33 टक्के होता. भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई

 राज्यातील धरणांमधील पाणीसाठा केवळ 24 टक्के असून मागील वर्षी याच काळात तो 33 टक्के होता. भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी काही ठिकाणी शेतीसाठी पाण्याच्या उपशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मान्सून आणखी लांबल्यास राज्यात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाणीसाठा जपणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

 

राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून कमी पाण्यात येणाऱ्या भरडधान्यांच्या पिकांकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहनही करण्यात आले. खतांचा पुरवठा सुरळीत असून युरियाची काही प्रमाणात कमतरता असली तरी ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi