महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2026 चे पावसाळी अधिवेशन
प्रस्तावित विधेयकांची माहिती
• महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग (सुधारणा) विधेयक, 2026 (2026 चा अध्यादेश क्र. 3चे रुपांतरीत विधेयक) (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) (महाराष्ट्र अनुसूचित जाती आयोगामध्ये उपाध्यक्ष पद निर्माण करण्यासाठी)
• महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग (सुधारणा) विधेयक, 2026 (2026 चा अध्यादेश क्र. 4 चे रुपांतरीत विधेयक) (आदिवासी विकास विभाग) (महाराष्ट्र अनुसूचित जमाती आयोगामध्ये उपाध्यक्ष पद निर्माण करण्यासाठी)
• महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबांस प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, 2026 (2026 चा अध्यादेश क्र. 5चे रुपांतरीत विधेयक) (सामान्य प्रशासन विभाग) (कलम 4 ची सूधारणा)
• महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, 2026 (2026 चा अध्यादेश क्र. 6 चे रुपांतरीत विधेयक) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (कलम 109 च्या पोट कलम (3) चा खंड( छ) व पोट कलम (4) च्या खंड (घ) मध्ये सुधारणा)
• महाराष्ट्र औद्योगिक विकास (सुधारणा) विधेयक, 2026 (2026 चा अध्यादेश क्र. 7 चे रुपांतरीत विधेयक) (कलम 22 (2) नुसार मंडळाच्या कर्ज काढण्याच्या मर्यादेत सुधारणा करण्याकरिता) (उद्योग, उर्जा, कामगार विभाग)
• महाराष्ट्र रोजगार हमी (सुधारणा) विधेयक, 2026 (नियोजन विभाग) (2026 चा अध्यादेश क्र. 8 चे रुपांतरीत विधेयक) (विकसित भारत जी.रामजी कायदा 2025 याच्या कलम 30 नुसार महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम कायद्यात सुसंगता आणणेबाबत)
• महाराष्ट्र महानगरपालिका कायदे (सुधारणा) विधेयक, 2026 (2026 चा अध्यादेश क्र. 9) (नगर विकास विभाग) (पालिका सदस्य, महापौर व अध्यक्ष यांना वैधता प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधील वाढवून देण्याकरिता)
• महाराष्ट्र खाजगी कौशल्यविद्यापीठे (स्थापना व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक (कौशल्य विभाग) (नवीन खाजगी आय.ई.एस. कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबत)
• महाराष्ट्र वस्तू व सेवा (सुधारणा) विधेयक, 2026 (वित्त विभाग) (केंद्रीय जीएसटी कायद्याशी सुसंगती राखण्यासाठी कर, जमापत्र व परतावा या संबंधीच्या तरतुदीमध्ये बदल)
• महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2026 (वित्त विभाग) (अतिरिक्त खर्च भागविण्यासाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवश्यक रकमेच्या विनियोजनास व खर्चास मान्यता देण्यासाठी)
०००००
No comments:
Post a Comment