जलयुक्त शिवार अभियानातील कामे गतीने पूर्ण करा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा २०२६ संपन्न
• कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर
• राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध
• शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर
मुंबई, दि.२१ : यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामे आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा २०२६ बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, कृषि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment