सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक स्तरांवर व्यापक जनजागृती केली जाणार आहे. युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीकडे प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन जनजागृतीस हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत किनारी भागांतील तिवरांच्या अनधिकृत तोडीबाबतही लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधले. या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री ॲड. शेलार यांनी दिले.
No comments:
Post a Comment