Saturday, 23 May 2026

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात

 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली ही अत्याधुनिक यंत्रणा मोठ्या प्रमाणावरील नियमित तसेच तातडीच्या बायोकेमिकल तपासण्या वेगाने आणि अचूकपणे करण्यास सक्षम आहे. 24 तास कार्यरत असलेल्या सेंट्रल पॅथॉलॉजी लॅबमध्ये ही प्रणाली बसविण्यात आल्याने नमुन्यांच्या तपासणीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल हे मुंबईतील महत्त्वाचे शासकीय वैद्यकीय संस्था असून, येथील बायोकेमिस्ट्री विभाग वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहे. आधुनिक स्वयंचलित अॅनालायझर्सच्या साहाय्याने दररोज मोठ्या प्रमाणावर नमुन्यांची तपासणी करण्यात येते. नव्या उपकरणामुळे प्रयोगशाळेतील कार्यक्षमता, अचूकता आणि अहवाल वितरणाचा वेग अधिक सुधारला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi