इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीतून नायर रुग्णालयात
अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अँनालायझर; रुग्णांना जलद व अचूक निदान सेवा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 21 : मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या सीएसआर निधीतून अत्याधुनिक पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार निदान सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राज्यातील सार्वजनिक आरोग्य
व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईसारख्या महानगरात सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. नायर रुग्णालयातील नव्या हायटेक बायोकेमिस्ट्री अॅनालायझरमुळे रुग्णांच्या तपासणी अहवालांचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून डॉक्टरांना उपचारासंदर्भात जलद निर्णय घेणे शक्य होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता वाढविणे ही राज्य शासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment