महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची
डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी घेतली सदिच्छा भेट
· बालपोषण सुधारण्यासाठी समन्वित उपाययोजनांवर सविस्तर चर्चा
मुंबई, दि. २१ : जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माजी मुख्य वैज्ञानिक तथा जागतिक किर्तीच्या भारतीय बालरोगतज्ज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यातील बालपोषण, कुपोषण प्रतिबंध आणि पोषण अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यातील बालआरोग्य सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेताना मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागामार्फत सुरू असलेल्या प्रभावी आणि लोकाभिमुख उपक्रमांची माहिती दिली.
डॉ. स्वामिनाथन यांनी देशातील ११२ आकांक्षी जिल्ह्यांमध्ये केलेल्या अभ्यासाच्या आधारे काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे मांडली. राज्यातील बालपोषण योजनांच्या अंमलबजावणीत डेटा गुणवत्तेला अधिक बळकटी देणे, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण व तांत्रिक सहाय्य वाढविणे तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागांतील कुपोषित बालकांची वेळेत नोंद होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment