Wednesday, 8 April 2026

राज्यातील वीज वितरण व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांकडून

 राज्यातील वीज वितरण व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांकडून

महावितरणाच्या आर्थिक पुनर्रचनेनंतर राज्यातील वीज वितरण व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्याकडून केले जाईल. यात कृषी वितरण संस्था म्हणजेच एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड- एमसएएपीएल कंपनी केवळ कृषी ग्राहकांना वीज पुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देईल. तर अकृषिक वितरण संस्था म्हणजेच महावितरण औद्योगिकवाणिज्यिकघरगुती आणि इतर बिगर कृषी ग्राहकांना सेवा पुरवेल.  या दोन्ही कंपन्यांचा वीज विक्रीमहसूल व खर्चाचा तपशील यांचा लेखा-जोखा स्वतंत्रपणे मांडला जाईल. विभाजनानंतर सहा ते नऊ महिन्यांच्या कालावधीत महावितरण आयपीओ आणला जाईल. त्यासाठी सेबीकडे आवश्यक त्या मंजुरी व वित्तीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. महावितरणचा आयपीओ – नवीन समभाग (फ्रेश इश्यू) आणि शासनाकडील समभाग विक्री (ऑफर फॉर सेल) याद्वारे आणला जाईल. यामुळे महावितरणाला विस्तारासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल. यातून स्मार्ट मिटरिंग व डीजिटल वितरण प्रणालीऊर्जा संक्रमणाशी संबंधित गुंतवणूकवितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण हे करता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi