Thursday, 9 April 2026

उरमोडी धरण जलाशयास ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण

 उरमोडी धरण जलाशयास छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण

 

मुंबईदि. ८ : सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाच्या जलाशयाचे छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा शासन निर्णय आज जलसंपदा विभागाने जारी केला आहे.

 

उरमोडी धरणामुळे सातारा जिल्ह्यातील सातारामाण व खटाव तालुक्यांमध्ये कृषी सिंचन क्षेत्रात मोठा वाटा असून यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या जलाशयाचे नामकरण करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव प्राप्त झाला होता. या संदर्भात सातारा जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थानी अशा प्रकारची मागणी केली होती.

 सध्या धरणांच्या जलाशयांना महापुरुषांची नावे देण्याबाबत शासनाचे स्वतंत्र धोरण असून या प्रकरणात विशेष बाब म्हणून छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

 

या महत्वपूर्ण निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलगिरीश महाजन यांचे सातारकराकडून विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.  

सदर शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi