Tuesday, 21 April 2026

वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णांना मदतीसाठी आरोग्य योजनांची एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करावी

 वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णांना मदतीसाठी

आरोग्य योजनांची एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करावी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई दि. 20 :- राज्यातील नागरिकांना आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबविते. राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांमधून अधिक प्रभावी व सुलभ मदत मिळावी यादृष्टीने एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शासकीय योजना मदत व समन्वय कक्ष’ संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीत मित्रा’ (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सादरीकरण केले. बैठकीस शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव किरण वसाकातसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi