Wednesday, 8 April 2026

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना

 विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिकएकात्मिक शहरी विकासाला चालना

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•          व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 8.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकउद्योग विभाग व एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार

 

मुंबईदि. 8 : शाश्वत नागरी विकासऔद्योगिक व पर्यटन वृद्धीनवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकासहरित ऊर्जाआधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जीउद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन आणि विन ग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi