Sunday, 19 April 2026

मित्रा'आणि ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ यांच्यात ५६ लाख वृक्षारोपण व उपक्रमांबाबत करार

 'मित्रा'आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया’ यांच्यात

५६ लाख वृक्षारोपण व उपक्रमांबाबत करार

 

मुंबईदि. १८ : महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक सल्लागार संस्था आलेल्या  महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यामध्ये पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत ५६ लाख वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबवून  राज्यातील हवामान कृतीला (Climate Action) गती देण्यात येणार आहे.

पृथ्वी दिन २०२६ निमित्ताने करण्यात आलेला हा सामंजस्य करार शाश्वत विकासाची चौकट मजबूत करण्यासाठी तसेच नागरिकसंस्था आणि उद्योगांना हरित भविष्यासाठी एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या भागीदारीत MITRA संस्थेकडून धोरणात्मक मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ दिले जाणार असूनअर्थ डे नेटवर्क इंडिया ही संस्था प्रत्यक्ष अंमलबजावणीजनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.

या सहकार्यांतर्गत महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार

 मिशन लाइफ (Mission LiFE): नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी राज्यव्यापी आराखडा

सरकारी ऊर्जा ऑडिट चॅलेंज: ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी उत्तरदायित्व निश्चित करणे

आर्टिस्ट फॉर द अर्थ: हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

 मुंबईला सस्टेनेबल इव्हेंट्स कॅपिटल’ बनवणे: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जागतिक स्तरावर शाश्वत कार्यक्रमांचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi