Monday, 13 April 2026

१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात महिला व बालविकास विभाग प्रथम

 १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात महिला व बालविकास विभाग प्रथम

महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

 

मुंबई -  महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत  प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव  यांचा राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या  हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.

 

हा सेवाकर्मी उपक्रम राज्यातील शासकीय सेवांची प्रगती सर्वांगीणपणे मोजण्यासाठी तसेच पारदर्शककार्यक्षम आणि जबाबदार प्रशासनाला चालना देण्यासाठी राबविण्यात आला होता. या अंतर्गत विभागाच्या संघटनात्मक रचनासेवाप्रवेश नियमपदोन्नती व थेट भरती स्थितीगोपनीय अहवालांचे व्यवस्थापनअनुकंपा नियुक्ती प्रक्रिया, iGOT पोर्टलवरील प्रशिक्षण तसेच विभागीय चौकशी प्रकरणांच्या निपटाऱ्यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

 

तसेच सेवाकर्मी टेक’ घटकाद्वारे तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल प्रशासनाची प्रगती तपासण्यात आली. यात पदोन्नती ट्रॅकिंग, ‘डिजिटल महापरद्वारे गोपनीय अहवालांचे डिजिटायझेशन, iGOT प्रशिक्षण पूर्णता आणि E-HRMS प्रणालीचा प्रभावी वापर यांचा समावेश होता.

 

या  मूल्यमापनात प्रथम क्रमांक मिळवणे हे महिला व बालविकास विभागाच्या सक्षम प्रशासन पद्धतीतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उत्कृष्ट सेवा देण्याच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

या यशाबद्दल  महिला व बालविकास विभागाच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असूनमहाराष्ट्रातील नागरिकांसाठी अधिक पारदर्शकप्रतिसादक्षम आणि नागरिक-केंद्रित प्रशासन बळकट होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi