Monday, 20 April 2026

क्षमता विकास आयोग आणि 'कर्मयोगी भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान 'साधना सप्ताह'

 क्षमता विकास आयोग आणि 'कर्मयोगी भारतयांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान 'साधना सप्ताहसाजरा करण्यात आला. 'तंत्रज्ञानपरंपरा आणि मूर्त परिणाम ही यामागची संकल्पना होती. 47 लाख शासकीय कर्मचारी साधना सप्ताहमध्ये सहभागी झालें होते. 33 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी विहित केलेले चार तासांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

महाराष्ट्रातील तब्बल 5 लाखांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी 'आयजीओटीया डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रत्येकी किमान 4 तासांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. राज्याच्या या समर्पित प्रयत्नांची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची विशेष श्रेणीत निवड करण्यात आली.

महाराष्ट्राच्या प्रशासकीय शिस्तीचे आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आधारित प्रतिसादाचे विशेष कौतुक  मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. तसेच त्यांनी साधना सप्ताह 2026 मधील सहभाग हा केवळ तांत्रिक नसून तो शासकीय यंत्रणेतील एका मोठ्या वर्तणूक बदलाचे प्रतिबिंब असल्याचे सांगितले. यामुळे प्रशासकीय क्षमता बांधणी ही केवळ श्रेणीबद्ध रचनेपुरती मर्यादित न राहताती थेट सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा घडवून आणणारी ठरेल. तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल साधनांचा वापर करून कर्मचारी स्वतःला अपडेट करत आहेतही समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi