Wednesday, 8 April 2026

भाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा -

 नाशिक त्र्यंबकेश्वर च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या

भाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा

-सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई दि.७: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवण्याचे निर्देश  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले .

आरोग्य मंत्रालयातील समिती कक्षात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी नाशिक परिमंडळातील आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, यंदा सिंहस्थ पर्वणी निमित्त नाशिक मधील तेरा घाटावर अंदाजे १२ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधीकुंभमेळा प्राधिकरण आणि विविध विभागांच्या समन्वयातून त्र्यंबकरामकुंडसीता गुंफासाधू धाममुक्ती धाम व इतर धार्मिक स्थळावर आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात यावा.  लवकरच स्वतः नाशिक येथे भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi