कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारी पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषद
- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
· जयपूर येथे पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषद
मुंबई, दि. 7 : पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषद ही केंद्र आणि राज्यांमधील समन्वय अधिक मजबूत करत शेती क्षेत्रासाठी ठोस दिशा देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या माध्यमातून घेतलेले निर्णय थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीस चालना देतील, असे मत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. ते जयपूर येथे आयोजित पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेत बोलत होते.
देशातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्षेत्रीय परिषदांच्या मालिकेची सुरुवात जयपूर येथे पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेद्वारे झाली. या परिषदेत महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा राज्यांचे कृषी मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी झाले.
No comments:
Post a Comment