ना. म. जोशी मराठी शाळा क्र.२ येथे
१० एप्रिल रोजी समाधान शिबिराचे आयोजन
मुंबई, दि.९ : राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता बृहन्मुंबई म.न.पा. मराठी शाळा क्र.२, ना.म. जोशी मार्ग, लोअर परेल मोनोरेल स्टेशनजवळ, मुंबई येथील शिवडी विधानसभा निवडणूक कार्यालय, तळ व पहिला मजला येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना, महिलांना, दिव्यांगांना तसेच उपलब्ध नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे अर्ज भरून त्याची तिथेच पूर्तता करण्यात येवून दाखले वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवरच निवारण व्हावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिराचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री, महापौर, आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment