विखरन येथील 250 मे.वॅ. सौर प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र
‘एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार
- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत
मुंबई, दि. 9 : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास गती देण्यात द्यावी, असे निर्देश उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिले.
उद्योग मंत्री डॉ.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात झाली. बैठकीस पणन व रोजगार हमी मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासु, सहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाजनकोचे संबंधित अधिकारी तसेच मे. टी.पी. कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत सुमारे 1350 एकर एकूण क्षेत्रांपैकी अंदाजे 400 ते 500 एकर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावावरील तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश डॉ.सामंत यांनी दिले.
No comments:
Post a Comment