दर्जेदार ग्रामीण आरोग्य सेवेसाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्वपूर्ण
‘पल्स’च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था अधिक आधुनिक, तंत्रज्ञानसज्ज,
- वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ
राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित केल्याशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नाही. राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक आधुनिक, तंत्रज्ञानसज्ज, संशोधनप्रधान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, परिषदेत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, डीन, विशेषतज्ज्ञ, खाजगी शैक्षणिक संस्था तसेच आधुनिक वैद्यकीय उपकरणे उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहेत. याचा राज्याच्या मेडिकल टूरिझम आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणे यासाठी या परिषदेचे सहकार्य लाभणार आहे.
No comments:
Post a Comment