Sunday, 15 March 2026

नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता

 देशातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता म्हाडा सुकाणू अभिकरण (नोडल एजन्सी) म्हणून म्हाडा सक्षमतेने कार्य करीत आहे. दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील ५५६ सदनिकांचे वितरण करण्यात आले. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगाव  येथील सुमारे ८६ एकर जागेवर वसलेल्या १९५ चाळींचा समावेश असून १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये २ हजार ५६० निवासी व अनिवासी गाळे असून १४ पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. वरळी येथे ९६८९ निवासी व अनिवासी गाळे असून ३४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येत आहेत.   नायगाव (दादर) येथे ३ हजार ३४४ निवासी व अनिवासी गाळे असून २० पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi