Monday, 16 March 2026

विशेषतः मुली, महिला विद्यार्थी तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यावर भर

 या उपक्रमात विशेषतः मुलीमहिला विद्यार्थी तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे मुक्त शिक्षण प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी शैक्षणिक संसाधने आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण व्यवस्था विकसित करण्याबरोबरच मुक्त शिक्षण कार्यक्रमांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवकल्पनात्मक पद्धती विकसित करण्यात येतील. याशिवाय विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनाशिष्यवृत्तीशुल्क सवलती तसेच कौशल्याधारित अभ्यासक्रमांशी जोडण्याच्या संधींचाही शोध घेतला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार असून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेलअशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi