Sunday, 15 March 2026

नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल

 नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल भव्य राष्ट्रध् मुख्यमंत्री देव

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्कवर भव्य राष्ट्रध्वजाचे लोकार्पण

 

नागपूरदि.१४: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण ठेवून नागपुरात उभारण्यात आलेला हा भव्य राष्ट्रध्वज येथील जनतेच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. 

येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तपत्र समूह यांनी  साकारलेल्या २०० फूट उंच भारतीय ध्वजाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार संदीप जोशी आणि विकास ठाकरेमहापौर नीता ठाकरेप्रभारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकरअतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैष्णवी बीलोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi