योजनेच्या जिल्हा समन्वयकानी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेशी समन्वय साधून काम करावे. लोकप्रतिनिधींनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रभावी पर्यवेक्षण ठेवावे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनआरोग्य समितीच्या नियमीत बैठका घेण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा. योजनेमध्ये सर्व शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे सहभागी झालेली असल्याने स्थानिक स्तरावर योजनेतील उपचार उपलब्ध होणेसाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे असे आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. विधानसभेत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व खाजगी रुग्णालयांनी सकारात्मक विचारांनी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment