पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, कृषी उत्पादने विविध देशांमधील बाजारपेठेत जाण्यासाठी 'इज ऑफ डूइंग बिजनेस' धोरणानुसार निर्यातदारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपली कृषी उत्पादने 'लोकल टू ग्लोबल' करण्यासाठी नवीन बाजारपेठेंचा शोध घेण्यात येत आहे. शेतमालाची 'फार्म टू फॉरेन मार्केट' अशा पद्धतीने मूल्य साखळी विकसित करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
कृषी निर्यातदारांनी जागतिक पातळीवर टिकेल अशा पद्धतीने कृषी मालाचे उत्पादन संवर्धन व वाहतूक व्यवस्था निर्माण करून जगात कृषी निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव करावे असे आवाहनही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केले.
आमदार चरण सिंग ठाकूर यांनीही विचार व्यक्त केले. पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment