Thursday, 26 March 2026

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांसाठी सध्या असलेले

 अधिक माहिती देताना इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे  म्हणालेवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांसाठी सध्या असलेले २००  कोटींचे भागभांडवल वाढवून एक हजार कोटी करण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे.

मंत्री सावे म्हणालेवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत केंद्र शासनाच्या एनबीसीएफडीसी

योजनेमधूनही लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.  या योजनेच्या काही अटी शिथिल करण्यात येणार असल्याने  लाभार्थींना या योजनेतून अधिकचा लाभ घेता येईल. तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी एक लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची योजना सुरू असल्याची माहितीही मंत्री सावे यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi