Thursday, 26 March 2026

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची

 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची

– मंत्री आदिती तटकरे

·         मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा उद्योग क्षेत्रात सहभाग

मुंबईदि. 26 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले आहेत. अशा अनेक महिलांना महिला विकास मंडळाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षणअनुदान आणि भांडवल यामुळे महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी तसेचउत्पादने बाजारपेठेत पोहोचविण्यासाठीही मोठा आधार मिळत आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

महिला विकास मंडळाच्या सभागृहात लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या सहकार्याने आयोजित भांडवल व अनुदान वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात महिला उद्योजकांना धनादेशशिवणयंत्र तसेच घरगुती चक्की व्यवसाय सुरू करण्यासाठी साहित्य देण्यात आले. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi