शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मास्टरस्ट्रोक
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· सामाजिक भान बाळगून अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प
मुंबई दि. ६: ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरे एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी शिंदे यांचे स्वागत केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment