अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026
विधान परिषद कामकाज
वृत्त क्र. 117
विधान परिषद प्रश्नोत्तरे :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाहेरून औषधे लिहून दिल्यास कडक कारवाई
- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि.१२ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य अमोल मिटकरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला येथील रुग्णांकरता औषधे उपलब्ध करून देणे या विषयी प्रश्न उपस्थित केला होता.
No comments:
Post a Comment