मंत्री शिरसाट म्हणाले की, व्यसनमुक्त दिंडीचा थेट कार्यक्रम होत असल्याने समाजातील इतर घटक, युवक स्फूर्ती घेतील. व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांच्या मनामध्येही काहीतरी करण्याची इच्छा निर्माण व्हावी. याचप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त संस्था, व्यक्तींचे कार्य महाराष्ट्रभर जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. आपण शिक्षणामध्ये आघाडीवर आहोत, मात्र व्यसनाधीन होऊ नका, युवकांना संदेश देत नशामुक्त भारत अभियानामध्ये भाग घेऊन महाराष्ट्र नशामुक्तमध्ये प्रथम क्रमांकावर राखण्याची ग्वाही प्रधान सचिव कांबळे यांनी दिली.
व्यसनमुक्त दिंडीमध्ये ढोल पथक, लेझीम पथक, वारकरी, कोळी बांधव, व्यसनमुक्त पुरस्कारार्थी, एनएसएस विद्यार्थी, ब्रह्माकुमारी, तृतीय पंथीय समूह सामील झाले होते. एक दो एक दो, दारू-तंबाखू छोड दो, व्यसनमुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत दिंडी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचली. यावेळी नशामुक्ती संघटनेचे मुख्य समन्वयक अमोल मडावी यांनी नशामुक्तीची शपथ दिली.
No comments:
Post a Comment