पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १६ : ' पाणी फाउंडेशन' ने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. या फाउंडेशनने राज्य शासनाच्या समवेत राज्याला बसणाऱ्या दुष्काळाची तीव्रता
कमी करण्यात मदत केली.यापुढेही पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामाच्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, तसेच अमित चंद्रा, विलास शिंदे आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment