दोन गावांत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मनरेगाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न
- मंत्री भरत गोगावले
मुंबई, दि.२५ : राज्यात दोन वेगवेगळ्या गावांमध्ये जमीन असलेल्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक असून, संबंधित नियमांच्या चौकटीत सर्व लाभधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत दिली.
राज्यात दोन वेगवेगळ्या गावांमध्ये जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनांचा लाभ मिळण्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडला.
No comments:
Post a Comment