सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. विधानसभेत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व खाजगी रुग्णालयांनी सकारात्मक विचारांनी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ मुख्य कार्यकारी अधिकारी, आण्णासाहेब चव्हाण यांनी उपचारांतील व दरातील वाढ, रुग्णालय अंगीकरणाची ऑनलाईन कार्यपद्धती, योजना राबविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या लागू केलेल्या टीएमएस 2.0, एचईएम 2.0 प्रणाली, दाव्यांची वेळेवर अदागयी, प्रोत्साहनपर लाभ याविषयी सादरीकरण करून उपस्थित खाजगी रुग्णालयांना माहिती दिली.
No comments:
Post a Comment