डायट’च्या माध्यमातून शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा
- शिक्षणमंत्री दादाजी भुसे
· जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची आढावा बैठक
मुंबई,दि.१३ - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वर्षभरात साडेसहा ते सात लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची बाब कौतुकास्पद आहे. शिक्षणाच्या बाबतीत डायट (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) च्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम, यशोगाथा राज्यभर राबविले जावेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या गुणवत्तेचा अभ्यास करून राज्यासाठी बेंचमार्क ठरवावा. तसेच शिक्षणात अपेक्षित बिंदूवर काम करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अपेक्षित अग्रेसर राज्य होण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
No comments:
Post a Comment