Thursday, 26 March 2026

प्रधानमंत्री - रस्ता अपघातग्रस्त रुग्णालयीन उपचार आणि हमी उपचार (पीएम - राहत) योजना”

 केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रधानमंत्री - रस्ता अपघातग्रस्त रुग्णालयीन उपचार आणि हमी उपचार (पीएम - राहत) योजना आणली आहे. या योजने अंतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील कोणत्याही रुग्णालयात दाखल झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने 7 दिवसांपर्यंत दीड (1.50) लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (रोखरहित) देण्यात येणार आहेत. अनेकदा अपघात झाल्यावर आर्थिक अडचणींमुळे उपचारास विलंब होतो. वेळेत उपचार मिळत नाहीत. पीएम-राहत योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होईलअसा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi