Wednesday, 25 March 2026

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचा ‘एआयसीटीई’कडे अर्ज

  

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचा ‘एआयसीटीई’कडे अर्ज

-          मंत्री चंद्रकांत दादा पाटील

 

मुंबईदि.२४ : गडचिरोली जिल्ह्यात तांत्रिक शिक्षणाच्या संधी अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई)नवी दिल्ली यांच्याकडे अर्ज केला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 

याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य विक्रम काळेप्रवीण दरेकरजगन्नाथ अभ्यंकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi