Tuesday, 17 March 2026

रुग्णालयास मंजुरी देताना महानगरपालिकेच्या दरानुसार १५ टक्के खाटा

 राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले कीरुग्णालयास मंजुरी देताना महानगरपालिकेच्या दरानुसार १५ टक्के खाटा उपलब्ध करून देण्याची अट घालण्यात आली होती. मात्रसंबंधित रुग्णालयाकडून ही अट पाळली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे  नूतनीकरण थांबविण्यात आले होते परंतु  न्यायालयीन प्रक्रियेमुळे रुग्णालयास नूतनीकरण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

रुग्णालयाच्या तिसऱ्या विंगच्या बांधकामास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच काही मजल्यांना वापर परवाना (ओसी) देण्यात आलेला नाही. उर्वरित बांधकामालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आवश्यकतेनुसार संबंधित मजले ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईलअसेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi