Thursday, 26 March 2026

यवतमाळ आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी संस्थेला कारणे दाखवा नोटीस

 यवतमाळ आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी

संस्थेला कारणे दाखवा नोटीस

     - मंत्री डॉ. अशोक वुईके

 

मुंबईदि. 25 : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जीवनदीप अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित आश्रमशाळेच्या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले,. 13 ऑगस्ट 2025 रोजी कु. दिपाली कोमटी या विद्यार्थिनीचा जिल्हा सामान्य रुग्णालययवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी अपर आयुक्तआदिवासी विकासअमरावती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालात विद्यार्थिनीच्या उपचाराबाबत शाळेकडून निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना शासनाकडून 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.

 आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित संस्थेला मान्यता रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच शाळेवर तात्काळ प्रशासक नेमून सखोल चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. वुईके यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi