पशुपालकांसाठी माहितीचा खजिना;
पशुसंवर्धन विभागाचे ‘महापशुधन वार्ता’ ई-मासिक
मुंबई, दि.27 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक, पशुवैद्यकीय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे. पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शासनाच्या योजना, नवनवीन तंत्रज्ञान, यशस्वी प्रकल्प, प्रशिक्षण उपक्रम, रोगनियंत्रण, तसेच विभागाच्या कार्याची सविस्तर माहिती या मासिकातून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.
No comments:
Post a Comment