Tuesday, 24 March 2026

मच्छीमारांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील

 मच्छीमारांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील

-         मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबई दि.23 :राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेसह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेअशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली.

 

मंत्रालय येथे मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत मस्यव्यवसाय मंत्री श्री. राणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एनमहाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले,राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाचे सदस्य प्रकाश एम. लोणारे तसेच विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi