Thursday, 19 March 2026

पुण्यातील स्पा सेंटरवर कारवाई; मानवी तस्करीविरोधात नवी नियमावली लवकरच

 पुण्यातील स्पा सेंटरवर कारवाईमानवी तस्करीविरोधात नवी नियमावली लवकरच

-    गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई दि.१८ : पुण्यातील विमाननगर येथील स्पा सेंटरवरील कारवाईत मानवी तस्करीबाबत माहिती उपलब्ध झाल्याने  राज्य शासनामार्फत स्पा सेंटरसाठी नवी नियमावली तीन ते चार  महिन्यांत लागू केली जाईलअसे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले

सदस्य अमित घोडके यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते.

गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, पुण्यातील विमाननगर येथील स्पा सेंटरवर डमी ग्राहकाच्या माध्यमातून  पोलिसांनी कारवाई केली असूनकाही परदेशी महिलाही आढळल्या. नव्या नियमावलीत गृह विभागाची एनओसीकडक निकष आणि कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती बंधनकारक केली जाणार आहे. तसेच महिलांना आणणाऱ्या एजंट्सवर थेट कारवाई करून मानवी तस्करीचे रॅकेट मोडीत काढण्यावर भर दिला जाणार आहे.

या चर्चेत सदस्य चित्रा वाघ यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi