नंदुरबार जिल्ह्यातील माजी आमदारांच्या
कुटुंबीयांच्या तक्रारीची आयजीमार्फत चौकशी
- गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. १८ : नंदुरबार जिल्ह्यातील माजी आमदारांच्या कुटुंबीयांसंबंधित क्रॉस प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आयजीमार्फत करण्यात येईल. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित एलसीबी पोलीस निरीक्षक हेड ऑफिसला अटॅच करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता.
राज्यमंत्री कदम यांनी सांगितले, या प्रकरणात दोन्ही पक्षांवर गुन्हे दाखल असून ॲट्रॉसिटी कायद्यान्वयेही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. एलसीबीच्या संबंधित पोलीस निरीक्षक यांच्या विरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल.
सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींनाही संरक्षण देण्यास राज्य शासन संवेदनशील असून प्रत्येक घटनेत न्याय्य व पारदर्शक कारवाई केली जाईल, असेही राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.
या चर्चेत ॲड. अनिल परब यांनी सहभाग घेतला.
०००००
No comments:
Post a Comment