संकेतस्थळ व डिजिटल सुविधा अधिक सक्षम
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळाचे आधुनिकीकरण करून ते अधिक सुरक्षित, सुलभ व नागरिकाभिमुख करण्यात आले. या संकेतस्थळावर आतापर्यंत 24.60 लाख व्ह्यूज नोंदवले गेले असून मागील 30 दिवसांत 10.77 लाख सक्रिय वापरकर्ते होते.
इंटरअँटिव्ह व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे नागरिकांना सेवा, अर्ज प्रक्रिया आणि तक्रार निवारणाबाबत मार्गदर्शन केले जात असून व्हॉटसअपद्वारे 10 हजारांहून अधिक संदेश पाठवून लोकसेवा हक्क अंतर्गतच्या सेवांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment