Tuesday, 17 March 2026

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबई उपनगरांतील प्रत्येक झाडाचे डिजिटल मॅपिंग, आरोग्य तपासणी आणि व्यवस्थापन

 मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात वृक्षसंवर्धनासंदर्भात बैठक झालीया बैठकीस आमदार संजय उपाध्यायमुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबई उपनगरांतील प्रत्येक झाडाचे डिजिटल मॅपिंगआरोग्य तपासणी आणि व्यवस्थापन करण्याची संपूर्ण प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीयामुळे मुंबई उपनगरातील सर्व झाडांचे वयप्रजातीआरोग्यस्थितीफांद्यांची वाढछाटणीची आवश्यकतातसेच झाडांमुळे होणारे पर्यावरणीय फायदे याची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.

या प्रक्रियेत लाईडर तंत्रज्ञानाद्वारे झाडांचे थ्रीडी इमेजिंग करून त्यांचे अचूक डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात येईल. प्रत्येक झाडाचा स्वतंत्र डिजिटल कोड तयार होऊन त्यामध्ये झाडाच्या वाढीची माहितीकार्बन शोषण क्षमताप्रदूषण कमी करण्यातील योगदानपावसाच्या पाण्याचा निचरा आणि इतर पर्यावरणीय फायदे नोंदवले जातील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi