Saturday, 7 March 2026

सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत

 महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची सर्वसमावेशक मांडणी करणारा अर्थसंकल्प


- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे


मुंबई, दि. ६ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प केवळ आकडे नाहीत; तर वास्तवाची जाणीव व भविष्याची झेप घेत २०४७ कडे जाणाऱ्या विकसित महाराष्ट्राचा प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासनाचे सूत्र निश्चित करणारा रोडमॅप आहे. या अर्थसंकल्पाची अनेक वैशिष्ट्ये आहेत, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायम ठेवणाऱ्या घोषणांमुळे राज्यातील कोट्यवधी शेतकरी बांधव व बहिणींना अभूतपूर्व दिलासा मिळाला, असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.


३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्याने तसेच, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार असल्याने मी मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले


महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची सर्वसमावेशक मांडणी करणारा अर्थसंकल्प असून, ग्रामीण विकासासोबतच नागरी भागातील सर्व घटकांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi