राज्याला कृषी निर्यातीत अग्रस्थानी ठेवण्यासाठी सक्षम मूल्यसाखळीवर भर
- पणन मंत्री जयकुमार रावल
· "ॲग्री एक्स्पोर्ट कॉन्क्लेव २०२६" चे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. २४: महाराष्ट्र देशातील प्रगत व अग्रगण्य कृषी राज्य असून देशाच्या एकूण कृषी उत्पादनात राज्याचा वाटा १० ते १२ टक्के आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कृषी मालाची निर्यात राज्यातून होते. ही निर्यात वाढवण्यासाठी सॉर्टींग, ग्रेडिंग, आधुनिक पॅकेजिंग, जलद पुरवठा साखळी या माध्यमातून कृषी मालाचे मूल्यवर्धन करून राज्याला कृषी निर्यातीत जागतिक स्तरावर अग्रस्थानी ठेवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. ते "ॲग्री एक्सपोर्ट कॉन्क्लेव २०२६" मध्ये बोलत होते.
No comments:
Post a Comment