मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा :
· सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन
मुंबई दि.13 : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभाग घ्यावा यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार शांताराम मोरे, आमदार सुलभा गायकवाड, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार मनिषा चौधरी, आमदार दिलीप लांडे, आमदार संजय उपाध्याय, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव डॉ.निपुण विनायक, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आयुष्मान भारत - मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अण्णासाहेब चव्हाण व मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री आबिटकर म्हणाले की, गरीब व गरजू नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा राज्य शासनाचा प्रमुख उद्देश आहे. या दृष्टीने एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळण्यासाठी मोठ्या आणि नामांकित खाजगी रुग्णालयांनीही यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा,
No comments:
Post a Comment