पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करावा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता
· श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक
मुंबई, दि. ५ : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे, तर देशातून मोठ्या संख्येने भाविक घेत असतात. या परिसराचे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. या मंदिर परिसराचा विकास हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकासाचा एकूण आराखडा २५० कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी ८० कोटी रुपयांची कामे सुरू झालेली आहेत. श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसराचा सुधारित १७० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
No comments:
Post a Comment