Tuesday, 24 March 2026

चंद्रपूरमधील सहकारी संस्थांतील धान खरेदी व्यवहारांची चौकशी

 चंद्रपूरमधील सहकारी संस्थांतील धान खरेदी व्यवहारांची चौकशी

- मंत्री छगन भुजबळ

 

मुंबई,दि.२३ :किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत धान खरेदी केली जाते. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. तसेच चंद्रपूरमधील धान खरेदीबाबत सहकारी संस्थातील व्यवहारांची प्रधान सचिव सहकार,पणन व वस्त्रोद्योग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. मुंबई यांच्याकडून चौकशी करण्यात येत  असल्याची माहिती अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

 आमदार रामदास मसराम यांनी याबाबत लक्षवेधी यावेळी उपस्थित केली होती.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi