Friday, 27 March 2026

२०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार

 २०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. २५ : राज्याच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलतमहाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ अंतर्गत २०३५ पर्यंत राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा संपूर्ण बस ताफा इलेक्ट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला आहेअशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली.

नियम २६० अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले कीवाढते वायूप्रदूषणइंधन दरातील चढ-उतार आणि जागतिक हवामान बदल यांचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही काळाची गरज ठरली आहे. सुमारे १४ हजार बसचा ताफा असलेली एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असूनया सेवेचे रूपांतर हरित ऊर्जेवर करण्याचा शासनाचा विचार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi