साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने
राज्यस्तरीय समिती गठीत; समितीकडून तातडीने अहवाल घेण्यात येणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : राज्यातील साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग असून त्याच्या आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर मुख्य सचिवांनी तातडीने समिती गठीत केली आहे.गठित समितीला स्वयंस्पष्ट अहवाल त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधानभवनात साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश कुमार, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष प्रताप ओहोळ, सर्वश्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, डॉ. विनय कोरे, राजेश टोपे, विक्रम काळे, अभिमन्यू पवार, अभिषेक पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, साखर संघाचे संचालक जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
No comments:
Post a Comment